शिवजयंती निमित्त गडकिल्ले,दुर्ग प्रतिकृती उभारून शिवजयंती साजरी | Pune | Maharashtra | Sakal Media |

2021-04-28 136

जुनी सांगवी येथे शितोळे नगर क्रिडा व युवक मंडळ व सखी महिला बचतगटाच्या वतीने शिवजयंती निमित्त येथील गजानन महाराज मंदीरासमोरील मैदानावर गडकिल्ले व पाण्यातील दुर्ग यांची प्रतिकृती उभारून शिवजयंती साजरी करण्यात आली. या प्रतिकृती पाहण्यासाठी सांगवी करांनी बाळगोपाळांसह उत्स्फुर्त दाद दिली. गड किल्ला व किल्य्यांची माहीती प्रत्येक प्रतिकृती समोर लावण्यात आली होती.यात किल्ले रायगड,प्रतापगड,तोरणा,सिंहगड,राजगड, पुरंदर, शिवनेरी, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आदींच्या प्रतिकृती हुबेहूब साकारण्यात आल्या होत्या. मधोमध राजधानी किल्ले रायगडाची दहा बाय दहा आकाराची प्रतिकृती साकारण्यात आली होती. यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे शासनाच्या नियमानुसार सार्वजनिक मिरवणुकांना बंधने आल्याने परिसरात मिरवणुका रद्द करून शिवजयंती साधेपणाने साजरी करण्यात आली. माजी नगरसेवक अतुल शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला.यावेळी आधिराज शितोळे,आरती राव,प्रणव राव,सुजित जाधव,उदय फरतडे,दिनेश केदारी,निरज झुंजारराव,मयुर मधाळे,शुभम जोशी, रोहित भोसले,भटु शिंदे आदी उपस्थित होते.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 89 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Videos similaires